मनःपूर्वक कृतज्ञता! 🙏*SiliconIndia* Magazine कडून ” *Top Pulmonologist – Doctor of the Year 2026* ” हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त होणे, हा माझ्या वैद्यकीय जीवनातील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. हा सन्मान श्वसनरोग व क्षयरोग क्षेत्रातील रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल आहे.हा सन्मान मी माझ्या रुग्णांना, गुरुजनांना, सहकारी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना, तसेच माझ्या कुटुंबीयांना, विशेषतः माझी जीवनसाथी सौ. शीला राजेंद्र ननावरे, जिने प्रत्येक टप्प्यावर निःस्वार्थ साथ, संयम आणि प्रोत्साहन दिले, त्यांना सप्रेम समर्पित करतो.गेल्या जवळपास चार दशकांपासून क्षयरोग व श्वसनरोग क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळाली. हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा असून, “TB-Free India”, उत्कृष्ट रुग्णसेवा, वैद्यकीय संशोधन आणि तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी मी अधिक समर्पित राहीन.आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास, शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
– *डॉ. राजेंद्र तातू ननावरे
Chest* Physician & Pulmonologist*“सेवा हीच साधना, संशोधन हाच मार्ग आणि रुग्णहित हेच सर्वोच्च ध्येय.” 🙏🌹