Published On: July 30, 2026
आजच्या ३० जुलै २०२६ च्या नवराष्ट्र मराठी ई-पेपरमध्ये माझे मत प्रसिद्ध झाल्याबद्दल आनंद वाटतो. सध्या वाढलेली हवेतील आर्द्रता आणि सतत बदलणारे हवामान यामुळे विषाणूजन्य संसर्ग व श्वसनविकार झपाट्याने वाढत आहेत. रुग्णालयातील OPD मध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, इन्फ्लूएंझा, कोविड-१९, RSV, अॅलर्जी, दमा, ब्राँकायटिस आणि COPD च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या: ✅ वारंवार हात स्वच्छ धुवा. ✅ गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. ✅ पुरेसे पाणी प्या. ✅ स्वतःहून औषधे घेऊ नका. ✅ ताप, श्वास लागणे किंवा लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. “प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.” – डॉ. राजेंद्र तातू ननावरे छातीरोग तज्ज्ञ व पल्मोनोलॉजिस्ट माजी वैद्यकीय अधीक्षक, गट क्षयरोग रुग्णालय, शिवडी, मुंबई संपादकीय व्यवस्थापक, इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिसबदलते हवामान, वाढलेली आर्द्रता आणि विषाणूजन्य आजार – सावध राहा! डॉ. राजेंद्र तातू ननावरे