माझ्या शैक्षणिक प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा Kennedy University कडून मला Doctor of Philosophy (PhD) in Tuberculosis या अभ्यासक्रमासाठी Merit-Based Admission (गुणवत्ता व शैक्षणिक कामगिरीच्या आधारे प्रवेश) डॉ राजेंद्र ननावरे

माझ्या शैक्षणिक प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा Kennedy University कडून मला Doctor of Philosophy (PhD) in Tuberculosis या अभ्यासक्रमासाठी Merit-Based Admission (गुणवत्ता व शैक्षणिक कामगिरीच्या आधारे प्रवेश) डॉ राजेंद्र ननावरे

Published On: September 16, 2026

🎓 माझ्या शैक्षणिक प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा Kennedy University कडून मला Doctor of Philosophy (PhD) in Tuberculosis या अभ्यासक्रमासाठी Merit-Based Admission (गुणवत्ता व शैक्षणिक कामगिरीच्या आधारे प्रवेश) मिळाल्याचे अधिकृत प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे, ही आनंदाची बातमी आपणा सर्वांसोबत शेअर करताना मला अत्यंत समाधान वाटत आहे. विद्यापीठाच्या प्रवेश समितीने माझी शैक्षणिक पात्रता, दीर्घ वैद्यकीय अनुभव, क्षयरोग क्षेत्रातील सेवा, अध्यापन आणि संशोधन कार्याची दखल घेऊन माझी या PhD कार्यक्रमासाठी निवड केली आहे. गेली जवळपास चार दशके क्षयरोग (Tuberculosis) रुग्णसेवा, अध्यापन, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रांत कार्य करत असताना मिळालेल्या अनुभवाला आता संशोधनाच्या माध्यमातून अधिक शास्त्रीय स्वरूप देण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे. माझ्या PhD संशोधनाचा विषयही क्षयरोगाशी संबंधित असून, माझ्या दीर्घकालीन वैद्यकीय अनुभवातून TB रुग्णसेवा, संशोधन आणि भावी वैद्यकीय पिढीसाठी उपयुक्त शास्त्रीय योगदान देणे हे माझे ध्येय आहे. वय किंवा निवृत्ती ही ज्ञानसाधनेची अंतिम सीमा नसते. शिकणे, संशोधन करणे आणि समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करणे हा प्रवास आयुष्यभर सुरू राहतो. या नव्या शैक्षणिक प्रवासासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद अपेक्षित आहेत. 🙏🌹 डॉ. राजेंद्र तातू ननावरे Chest Physician & Pulmonologist PhD Scholar – Tuberculosis Kennedy University