राष्ट्रीय शिक्षक दिनी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी, कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (KMCRI), हुबळी, कर्नाटक येथे ज्येष्ठ छातीविकार व क्षयरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांना IMA Academy of Medical Specialities (IMA AMS) मुख्यालयातर्फे प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिप प्रदान होणार

राष्ट्रीय शिक्षक दिनी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी, कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (KMCRI), हुबळी, कर्नाटक येथे ज्येष्ठ छातीविकार व क्षयरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांना IMA Academy of Medical Specialities (IMA AMS) मुख्यालयातर्फे प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिप प्रदान होणार

Published On: August 13, 2026

राष्ट्रीय शिक्षक दिनी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी, कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (KMCRI), हुबळी, कर्नाटक येथे ज्येष्ठ छातीविकार व क्षयरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांना IMA Academy of Medical Specialities (IMA AMS) मुख्यालयातर्फे प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिप प्रदान होणार मुंबई, १३ ऑगस्ट २०२६ : मुंबईतील ज्येष्ठ फुफ्फुसरोग व क्षयरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांची Indian Medical Association – Academy of Medical Specialities (IMA AMS) यांच्या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी निवड झाली असून, त्यांच्या नामांकनास IMA Academy of Medical Specialities मुख्यालय, हैदराबाद यांनी अधिकृत मान्यता दिली आहे.   डॉ. ननावरे यांना ही फेलोशिप ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, Karnataka Medical College and Research Institute (KMCRI), Hubballi, Karnataka येथे होणाऱ्या IMA AMS राष्ट्रीय दीक्षांत समारंभात (Convocation) प्रदान करण्यात येणार आहे. हा समारंभ AMSCON-2026, IMA Academy of Medical Specialities च्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.   डॉ. ननावरे हे जवळपास चार दशकांचा वैद्यकीय, प्रशासकीय, अध्यापन, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनुभव असलेले ज्येष्ठ Chest Physician, Pulmonologist आणि Tuberculosis Specialist आहेत. त्यांनी मुंबईतील Group of TB Hospitals, Sewri येथे दीर्घकाळ सेवा बजावली असून Medical Superintendent या महत्त्वपूर्ण प्रशासकीय पदाची जबाबदारीही सांभाळली आहे.   औषध-प्रतिरोधक क्षयरोग (DR-TB), Bedaquiline आधारित उपचार, रुग्णालयीन संसर्ग नियंत्रण, आरोग्य कर्मचाऱ्यांमधील क्षयरोग प्रतिबंध, वैद्यकीय शिक्षण आणि क्लिनिकल संशोधन या क्षेत्रांत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांनी Fellowship in Pulmonology पूर्ण केली असून फुफ्फुसरोग क्षेत्रातील त्यांचे शैक्षणिक व तज्ज्ञत्व अधिक दृढ झाले आहे.   त्यांच्या नावावर ४० हून अधिक संशोधन लेख, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील वैज्ञानिक सादरीकरणे, वैद्यकीय व शैक्षणिक पुस्तके तसेच अनेक CME, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे.   त्यांच्या वैद्यकीय व शैक्षणिक योगदानाची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. Indian Medical Association Headquarters कडून त्यांना “IMA HQ Honorary Professor – 2022” हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानंतर IMA Maharashtra State कडून त्यांच्या वैद्यकीय शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “Best Academician of the Year – 2023” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच फुफ्फुसरोग चिकित्सा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत SiliconIndia Healthcare Magazine ने त्यांना “Top Pulmonologist – Doctor of the Year 2026” या सन्मानाने गौरविले आहे.   आता मिळणारी IMA Academy of Medical Specialities Fellowship ही त्यांच्या फुफ्फुसरोग चिकित्सा, क्षयरोग नियंत्रण, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाची आणखी एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक मान्यता ठरणार आहे.   AMSCON-2026 ही राष्ट्रीय परिषद ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी KMCRI, Hubballi येथे आयोजित करण्यात आली असून, डॉ. ननावरे यांना ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात फेलोशिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.   डॉ. राजेंद्र तातू ननावरे   MBBS, TDD, DETRD, AFIH, FCCP, PGDHA, DPH Fellowship in Pulmonology ज्येष्ठ छातीविकार, फुफ्फुसरोग व क्षयरोगतज्ज्ञ माजी वैद्यकीय अधीक्षक – Group of TB Hospitals, Sewri, Mumbai IMA HQ Honorary Professor – 2022 Best Academician of the Year – 2023, IMA Maharashtra State Top Pulmonologist – Doctor of the Year 2026, SiliconIndia Healthcare Magazine Editorial Manager – Indian Journal of Tuberculosis PhD Scholar – Tuberculosis