मी ‘नाना’… आणि माझ्या मनातील नाना पाटेकर! ❤️🙏

मी ‘नाना’… आणि माझ्या मनातील नाना पाटेकर! ❤️🙏

Published On: October 9, 2026

मी ‘नाना’… आणि माझ्या मनातील नाना पाटेकर! ❤️🙏 काल पहाटे गाडी चालवत असताना एफएम रेडिओवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याविषयी चर्चा ऐकली आणि मन क्षणात महाविद्यालयीन जीवनात हरवून गेले. अपना हॉस्टेलमध्ये असताना माझे मित्र, दिवंगत डॉ. नरेंद्र पाडवी, जे पुढे भाजपचे आमदार झाले, ते माझ्या ‘ननावरे’ या आडनावामुळे मला प्रेमाने ‘नाना’ म्हणायचे! त्याच काळात अंकुश चित्रपटातून नाना पाटेकरांचा प्रभावी अभिनय पाहिला. त्यांची संवादफेक, भावनांची तीव्रता, देहबोली आणि अभिनयातील विलक्षण विविधता यांनी मला कायम प्रभावित केले. पण काल त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या माणुसकीने मन जिंकले! रेडिओवरील चर्चेत सांगितलेला एक प्रसंग मनाला भिडला. स्वतःच्या महागड्या गाडीसाठी जमवलेली मोठी रक्कम त्यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या मदतीसाठी दिल्याचे ऐकले. त्यांचा एक विचार मनात घर करून गेला— “ओंजळ भरल्यावर पाणी बाहेर पडणारच! गरजेपेक्षा जास्त पैसा साठवण्यापेक्षा तो कुणाच्या तरी उपयोगी पडला, तरच त्याचे खरे चीज!” किती मोठे जीवनतत्त्वज्ञान! कलाकार मोठा होतो अभिनयाने, पण माणूस मोठा होतो माणुसकीने! नाना पाटेकरांचा मी चाहता होतोच; पण आज त्यांच्या संवेदनशीलतेमुळे त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढला. नावातला ‘नाना’ ही योगायोगाची गोष्ट; पण माणुसकी जपण्याची प्रेरणा ही आयुष्यभराची शिदोरी! — डॉ. राजेंद्र तातू ननावरे छातीरोगतज्ज्ञ व पल्मोनोलॉजिस्ट #नाना_पाटेकर #माणुसकी #जीवनमूल्ये #आठवणी #शेतकरी